Raksha Bandhan 2025: तुमचा भाऊ कोणत्या राशीचा? लाडक्या बहिणींनो मग ‘या’ रंगाची बांधा राखी, बघा कधीपर्यंत असणार मुहूर्त?

Raksha Bandhan 2025: तुमचा भाऊ कोणत्या राशीचा? लाडक्या बहिणींनो मग ‘या’ रंगाची बांधा राखी, बघा कधीपर्यंत असणार मुहूर्त?

| Updated on: Aug 08, 2025 | 4:25 PM

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर एक खास राखी बांधतात, जी संरक्षणाचे प्रतीक आहे. राखी बांधल्यानंतर, बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात. त्या बदल्यात, भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो.

रक्षाबंधन हा सण 9 ऑगस्ट म्हणजेच उद्या साजरा केला जाणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उद्या देशभरात साजऱ्या होणाऱ्या राखी पौर्णिमेचे यंदा विशेष महत्त्व असल्याचे पाहायला मिळत आहे. 32 वर्षात पहिल्यांदाच श्रावण महिन्यात दोन पौर्णिमा आल्या असल्याने हा योग दुर्मिळ आहे. तर यंदा अनेक वर्षानंतर श्रावणात अंगारिका चतुर्थी आली हा दुसरा योग दुर्मिळ असल्याची माहिती ज्योतिषाचार्य डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजींनी दिली. उद्या दुपारी दीड वाजेपर्यंत राखी पौर्णिमेसाठीचा लाभदायक मुहूर्त असल्याने बहिणीला आपल्या लाडक्या भावाला राखी बांधता येणार आहे. उद्या दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या भावाला बहिणीने राखी बांधल्यास त्याचे शुभ परिणाम येणाऱ्या काळात पाहायला मिळतात, असे ज्योतिषाचार्य डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी यांनी सांगितले.

बहिणीने भावाला राखी बांधताना ‘येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:’, या विशेष मंत्राचा उल्लेख करावा, असंही ज्योतिषाचार्य डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी यांची सांगितले. तर तुमचा भाऊ कोणत्या राशीचा आहे? त्याला कोणत्या रंगाची राखी बांधल्यास फायदेशीर ठरेल बघा हा व्हिडीओ…

Published on: Aug 08, 2025 04:18 PM