Ramraje Nimbalkar : टाक मला तुरूंगात, तुला तुरूंगातून थर्ड… रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकारांना इशारा

Ramraje Nimbalkar : टाक मला तुरूंगात, तुला तुरूंगातून थर्ड… रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकारांना इशारा

| Updated on: Nov 03, 2025 | 4:34 PM

रामराजे निंबाळकर यांनी रणजितसिंह निंबाळकरांना थेट इशारा दिला आहे, मला तुरुंगात टाका, मी तुम्हाला तुरुंगातून थर्ड लावेन. सभापती असताना खंडणी प्रकरणात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पत्राचा संदर्भ देत, निंबाळकर यांनी या प्रयत्नांमागे असलेल्या मास्टरमाईंडला आव्हान दिले आहे.

रामराजे निंबाळकर यांनी भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर यांना थेट आव्हान देत एक खळबळजनक विधान केले आहे. टाक मला तुरुंगात, तुला तुरुंगातून थर्ड लावेन, असे निंबाळकर यांनी म्हटले. सभापतीपदावर असताना आपल्याला खंडणी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट रामराजे निंबाळकर यांनी केला आहे. २०२२ मध्ये, दोन कॉन्ट्रॅक्टरच्या भांडणात आपल्याला गुंतवण्याचा प्रयत्न झाला, असे त्यांनी सांगितले.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पत्र त्यांच्याकडे असल्याचे निंबाळकर यांनी नमूद केले. या पत्रानुसार, एका कॉन्ट्रॅक्टरकडून खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. या कथित प्रयत्नांमागे असलेल्या मास्टरमाईंडला आपण घाबरत नसून, ७७ व्या वर्षी तुरुंगात टाकले तरी फलटणमध्ये कसे राहायचे हे बघू, असा इशारा रामराजे निंबाळकर यांनी दिला.

Published on: Nov 03, 2025 04:33 PM