मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार रणबीर-आलियाचं लग्न

मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार रणबीर-आलियाचं लग्न

| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 1:43 PM

मेहंदीच्या कार्यक्रमानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी पत्रकार आणि फोटोग्राफर्सशी बोलताना लग्न आज (14 एप्रिल) पार पडणार असल्याचं सांगितलं. 'वास्तू' या निवासस्थानीच लग्नसोहळा पार पडेल असं त्या म्हणाल्या.

13 एप्रिलपासून अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. रणबीरच्या ‘वास्तू’ या निवासस्थानी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला कपूर आणि भट्ट कुटुंबीयांसोबत बॉलिवूडमधील मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित होते. मेहंदीच्या कार्यक्रमानंतर नीतू कपूर यांनी पत्रकार आणि फोटोग्राफर्सशी बोलताना लग्न आज (14 एप्रिल) पार पडणार असल्याचं सांगितलं. ‘वास्तू’ या निवासस्थानीच लग्नसोहळा पार पडेल असं त्या म्हणाल्या.