Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले…

Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले…

| Updated on: Nov 20, 2026 | 5:08 PM

जळगाव सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याचे दर सहा हजार रुपयांनी तर चांदीचे दर दहा हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या बदलांमुळे भारतीय बाजारातही किंमती घसरल्या असून, सप्टेंबर २०२५ नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. लग्नासाठी खरेदी करणाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण नोंदवली गेली आहे. सोन्याच्या दरात तब्बल सहा हजार रुपयांची घसरण झाली असून, चांदीच्या दरात दहा हजार रुपयांपर्यंतची मोठी घट पाहायला मिळत आहे. या घसरणीमुळे सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख २८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आजच्या दिवशी सोन्याच्या दरात सहा हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल १२ हजार रुपयांची घसरण झाली. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमती सप्टेंबर २०२५ नंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. या आठवड्यात सोन्यामध्ये जवळपास ९% तर चांदीत १३% पेक्षाही जास्त घसरण नोंदवली गेली आहे.

किंमती सातत्याने कमी होत असल्यामुळे, लग्नासाठी सोनं-चांदी खरेदी करण्याचा बेत आखणाऱ्या ग्राहकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचे जीएसटीसह दर १ लाख २८ हजार रुपये प्रति तोळा आहेत, तर चांदी जीएसटीसह प्रति किलो १ लाख ५९ हजार ६५० रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या बदलांमुळे भारतीय बाजारातही सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, या घसरलेल्या दरांमुळे सोने-चांदीच्या खरेदीत तेजी येण्याची शक्यता आहे.

 

Published on: Nov 20, 2026 5:08 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us