Sanjay Raut | रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल; थेट केंद्रालाच सवाल
अमेरिकेतील टेक्सास येथे रिलायन्स इंडस्ट्रीकडून मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा प्रकल्प तेल शुद्धीकरणाशी संबंधित असून गेल्या 50 वर्षांनंतर अमेरिकेत उभारला जाणारा हा पहिला भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे.
अमेरिकेतील टेक्सास येथे रिलायन्स इंडस्ट्रीकडून मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा प्रकल्प तेल शुद्धीकरणाशी संबंधित असून गेल्या 50 वर्षांनंतर अमेरिकेत उभारला जाणारा हा पहिला भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. या घोषणेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राऊत म्हणाले की, या व्यापाराचा किंवा गुंतवणुकीचा फायदा मोजक्या उद्योगपतींनाच होणार आहे. भारतामधील एखादा मोठा उद्योग अमेरिकेत गुंतवणूक करत असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत उत्तर द्यावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. भारतातील उद्योग परदेशात का जात आहेत? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. राऊत पुढे म्हणाले की, जी गुंतवणूक भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात व्हायला हवी होती, ती परदेशात का होत आहे? हा चिंतेचा विषय आहे. भारतातील उद्योगपतींना आपल्या देशात गुंतवणूक करण्यापेक्षा परदेशात गुंतवणूक करण्याची गरज का भासते? ही दुर्दैवी बाब असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
