Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या… योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
राज्यातील मोफत साडी योजना बंद करण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

माध्यमांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, आता सरकारला लाडक्या बहिणींसाठी साडी देणेसुद्धा परवडेनासे झाले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीपूर्वी विविध घोषणा करत आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र आता आर्थिक तुटवड्याचे कारण पुढे करून योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
रोहिणी खडसे यांनी पुढे सांगितले की, महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनांबाबत सरकारने सातत्य ठेवणे आवश्यक आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी आर्थिक अडचणींचे कारण देत योजना बंद करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, मोफत साडी योजना बंद करण्याच्या निर्णयावरून राज्यातील राजकारण तापले असून, विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकार याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे आता राज्यभरातील महिलांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.