MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

| Updated on: Oct 07, 2026 | 12:13 PM

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत रोहित पवारांनी भूमिका स्पष्ट केली. पुणेकरांना त्रास होऊ नये म्हणून जोशी मार्गाची निवड केली. भाजप कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाज्योती परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे त्यांनी सांगितले. गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त केला.

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात आमदार रोहित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पुणेकरांना कोणताही त्रास होऊ नये, या हेतूने एस.एम. जोशी मार्ग हे आंदोलनाचे ठिकाण निवडल्याचे त्यांनी सांगितले. अलका चौक किंवा अहिल्या लायब्ररीसारख्या गर्दीच्या ठिकाणी आंदोलन टाळले, कारण तेथे मोठी वाहतूक कोंडी झाली असती. या आंदोलनावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांविरोधात पवारांनी गंभीर आरोप केले. हा याचिकाकर्ता महानगरपालिकेतील एका भाजप नेत्याचा कार्यकर्ता असून, तो महानगरपालिकेची कामे घेतो आणि बांधकाम व्यवसायातही सक्रिय आहे, असे त्यांनी नमूद केले.

रात्री याचिकाकर्ता आणि एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याची भेट झाल्याचा दावा करत, त्यांनी सीडीआर तपासणीची मागणी केली. महाज्योती परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोपही पवारांनी केला. एकाच संगणकावर पाच-पाच विद्यार्थी बसवले जात आहेत आणि परीक्षा उशिराने सुरू झाल्याने मुलींना त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळण्यासारखा असल्याचे म्हणत, सरकारला त्यांच्या राजकीय अहंकारापेक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली.

Published on: Oct 07, 2026 12:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us