Sanjay Raut | पडद्यामागील घडामोडींमुळे अजितदादा अस्वस्थ होते… संजय राऊत यांचा मोठा दावा, रोहित पवारांशी झालेल्या चर्चेचा दिला हवाला

Sanjay Raut | पडद्यामागील घडामोडींमुळे अजितदादा अस्वस्थ होते… संजय राऊत यांचा मोठा दावा, रोहित पवारांशी झालेल्या चर्चेचा दिला हवाला

| Updated on: Feb 18, 2026 | 11:05 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची काल सत्र न्यायालयात भेट झाली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. राऊत म्हणाले की, सत्र न्यायालयात दोघेही एकत्र उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात सुरू असलेल्या कामाबाबत रोहित पवार यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची काल सत्र न्यायालयात भेट झाली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. राऊत म्हणाले की, सत्र न्यायालयात दोघेही एकत्र उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात सुरू असलेल्या कामाबाबत रोहित पवार यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. या प्रकरणात काय घडामोडी सुरू आहेत आणि पुढील भूमिका काय असेल, यावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पडद्यामागे झालेल्या काही राजकीय हालचालींमुळे अजित पवार अस्वस्थ होते अशी माहितीही रोहित पवार यांनी दिल्याचे राऊत यांनी नमूद केले. या घडामोडींवर सखोल चर्चा करण्यासाठी पुढील एक-दोन दिवसांत बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Feb 18, 2026 11:04 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us