सीसीटीव्हीत… रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय लेकीचा मृत्यू नेमका कशामुळे?

सीसीटीव्हीत… रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया; PAच्या 12 वर्षीय लेकीचा मृत्यू नेमका कशामुळे?

| Updated on: Aug 23, 2026 | 1:38 PM

आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या मुलीच्या मृत्यूने बारामतीत खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अस्पष्टता आहे. विशेष म्हणजे, बारामतीमध्ये सीसीटीव्ही प्रोजेक्ट मंजूर नसल्याने तपासात अडचणी येत असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. मृत मुलीच्या शरीरावर जखमा असून, तपासासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.

आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या मुलीचा बारामतीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही घटना हत्या आहे की आत्महत्या, याबाबत सध्या तरी अस्पष्टता आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या अभावामुळे तपासाला वेळ लागण्याची शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

बारामती शहरासाठी सीसीटीव्ही प्रोजेक्ट अजून मंजूर झालेला नाही. काही वर्षांपूर्वी अजित दादांनी बारामती शहरासाठी प्रत्येक कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे असावेत यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, हा प्रोजेक्ट अद्याप होम डिपार्टमेंटने मंजूर केलेला नसल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी घटना घडली, त्या परिसरातील एका इमारतीला सीसीटीव्ही कॅमेरा आहे, परंतु आसपासच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही नसल्याने तपासाला अडथळा येत आहे. सध्या शवविच्छेदन झालेले नाही, त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मृत मुलीच्या शरीरावर काही जखमा आढळल्या आहेत. तिचा हात आणि पाय मोडलेला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांशी चर्चा करून जखमांचे स्वरूप आणि मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मुलीची चप्पल टेरेसवर सापडल्याने तिने स्वतः उडी मारली का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Published on: Aug 23, 2026 1:38 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us