पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील गुप्त बैठकीबाबत रोहित पवारांचा मोठा खुलासा

पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील गुप्त बैठकीबाबत रोहित पवारांचा मोठा खुलासा

| Updated on: May 15, 2026 | 6:05 PM

राजकीय वर्तुळात वारंवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा रंगतच असतात. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाच्या आधी विलिनीकरणाबाबत महत्त्वाची बैठक झाल्याचं अनेक नेत्यांनी सांगितलं होतं. मात्र या बातम्या केवळ चर्चाच बनून राहिल्या होत्या. आता पुन्हा विलिनीकरणाच्या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये पुण्यात बराच काळ चर्चा झाली. याबाबत रोहित पवारांनी खुलासा केला आहे.

राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक पुण्यात पार पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसारच या चर्चेसाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते. इतकेच नाही, तर या गुप्त बैठकीत विलिनीकरणासोबतच तटकरेंनी तब्बल तीन वर्षांनंतर शरद पवारांची भेट घेतली यावरही चर्चा करण्यात आली. मात्र, कोणत्याही नेत्याने बैठकीबाबत स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. या प्रकरणावर जेव्हा रोहित पवारांना विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, ‘सध्या अनेक विषय आहेत चर्चा करण्यासाठी, राष्ट्रवादीचं विलिनीकरण, तटकरेंची भेट आणि आणखीदेखील असे मुद्दे आहेत ज्यासाठी बैठक गरजेची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असावी.’

Published on: May 15, 2026 06:05 PM
Follow Us