Rupali Chakankar | अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स; राजकीय व्यक्तींचा पहिला तपास सुरू होणार?

Rupali Chakankar | अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स; राजकीय व्यक्तींचा पहिला तपास सुरू होणार?

| Updated on: Mar 29, 2026 | 1:55 PM

अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची अडचण वाढल्याचे दिसत आहे. यापूर्वी त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांना राजीनामा देणे भाग पडले. आता विशेष तपास पथकाने (SIT) त्यांना समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची अडचण वाढल्याचे दिसत आहे. यापूर्वी त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांना राजीनामा देणे भाग पडले.
आता विशेष तपास पथकाने (SIT) त्यांना समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा परिस्थितीत, अशोक खरात व्यतिरिक्त या प्रकरणात पहिल्यांदा राजकीय व्यक्तीची चौकशी होणार असल्याचे दिसत आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना सहआरोपी करण्याची मागणी उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती.
महिला आयोग आणि पक्षातील पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच रुपाली चाकणकर यांच्यावर चौकशीची प्रक्रिया सुरु झाल्याचे समोर येत आहे. सदर प्रकरणात शिवानीका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. SIT सर्व सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असून रुपाली चाकणकर यांची चौकशीदेखील शक्य आहे. शिवानीका संस्थेच्या सर्व व्यवहार आता SIT च्या लक्षात असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की समन्स हे केवळ चौकशीच्या प्रक्रियेचा भाग आहे, काहीतरी अचानक आकाशातून पडलेले नाही.

Published on: Mar 29, 2026 01:55 PM
Follow Us