मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी रुपाली चाकणकर दिवंगत नेते रवींद्र पगार यांच्या घरी दाखल
भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. कोट्यवधींचा अनेकांना गंडा घातला आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांची एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येत होती.
भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. कोट्यवधींचा अनेकांना गंडा घातला आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांची एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येत होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.
रूपाली चाकणकर या आज त्यांच्या वकिलांसह नाशिकला रवाना झाल्या आहेत. याआधी त्यांनी एसआयटी चौकशीला सामोरे जाणं टाळलं होतं. महत्त्वाची अपडेट म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचं निधन झालं होतं, त्यामुळे रूपाली चाकणकर त्यांना सांत्वनपर भेट देणार असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पगार यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर त्या चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.
