Rupali Chakankar | एका महिन्यानंतर पुन्हा रुपाली चाकणकर ॲक्टिव्ह मोडवर, नवी अपडेट समोर
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचं नाव वारंवार घेतलं जात होतं.
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवलं होतं. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचं नाव वारंवार घेतलं जात होतं. त्यांच्यावर अनेक आरोपही करण्यात आले होते. चाकणकरांनी सर्व आरोप फेटाळले होते. दरम्यान त्यांच्याबाबतीत एक नवी अपडेट समोर आली आहे.
रुपाली चाकणकर एका महिन्यानंतर पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं सांगितलं जात आहे. नुकतीच त्यांची नाशिकच्या नांदूरमध्ये कार्यकर्त्यांशी बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय घडलं ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र त्यांचे बैठकीतील फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या बैठकीनंतर रुपाली चाकणकरांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Published on: Apr 28, 2026 12:55 PM
Follow Us
