Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय वापरल्यास थेट…

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांनी नाव, फोटो अन् शैलीचं ट्रेडमार्क केलं; परवानगीशिवाय वापरल्यास थेट…

| Updated on: Nov 15, 2026 | 1:10 PM

रुपाली चाकणकर यांनी त्यांचे नाव, फोटो, ओळख आणि वैयक्तिक शैलीचे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केले आहे. पूर्वपरवानगीशिवाय या घटकांचा वापर केल्यास कठोर कायदेशीर कारवाई, फौजदारी तसेच दिवाणी गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात टीका होत असून, रुपाली ठोंबरे-पाटलांनी चाकणकरांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.

रुपाली चाकणकर यांनी आपले नाव, फोटो, ओळख आणि वैयक्तिक शैलीचे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केले आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही त्यांचे नाव, फोटो किंवा विशिष्ट शैलीचा व्यावसायिक कारणांसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे की, रील, व्हिडिओ, फिल्म, टीझर किंवा प्रमोशनसाठी त्यांच्या परवानगीशिवाय वापर केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी तसेच दिवाणी गुन्हा दाखल केला जाईल. आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणीही केली जाईल, असे त्यांनी नमूद केले आहे.

या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. रुपाली ठोंबरे-पाटलांनी रुपाली चाकणकर यांच्या या भूमिकेवर टीका केली आहे. चाकणकरांनी आत्मपरीक्षण करावे, असे मत ठोंबरे-पाटलांनी व्यक्त केले आहे. खरात प्रकरणावर बोलू नये म्हणून चाकणकर कोर्टाच्या धमक्या देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे आगामी काळात हा मुद्दा राजकीय चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Published on: Nov 15, 2026 1:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us