Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल' या आगामी चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रपट निर्माते आणि संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या आगामी चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला असून, राज्य महिला आयोगाच्या माझी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रपट निर्माते आणि संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, एखाद्या जिवंत व्यक्तीची व्यक्तिरेखा चित्रपटात साकारायची असेल, तर संबंधित व्यक्तीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, या चित्रपटासाठी त्यांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर पावले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात अभिनेत्री दीपाली सय्यद आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाविरोधात कायदेशीर नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही रुपाली चाकणकर यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एका घडामोडीत रुपाली चाकणकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सुषमा अंधारे, अंजली दमानिया, आशा मिरगे आणि रुपाली ठोंबरे यांच्या विरोधातही दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व घडामोडींमुळे ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटाभोवतीचा वाद अधिकच तीव्र झाला असून, या प्रकरणात पुढे कोणते कायदेशीर निर्णय होतात, याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
