रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो ट्रेंडमार्क प्रकरणी मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं?
रुपाली चाकणकरांच्या ट्वीटवर "महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स" चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन रोडे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारचा ट्रेडमार्क माझ्या बघण्यात नाही, असे ते म्हणाले. जर कोणतेही प्रमाणपत्र दिले असेल, तर तो सत्तेचा गैरवापर आहे. ही संपूर्ण कल्पना हास्यास्पद असून, दुर्लक्ष करणेच योग्य, असेही त्यांनी नमूद केले.
रुपाली चाकणकरांच्या ट्वीटनंतर महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन रोडे पाटील यांनी एका ट्रेडमार्क संबंधित मुद्द्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारचं ट्रेडमार्क आपल्या बघण्यात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर या संदर्भात कोणतेही प्रमाणपत्र देण्यात आले असेल, तर तो थेट सत्तेचा गैरवापर आहे, असे गंभीर विधान सचिन रोडे यांनी केले. रोडे पाटील यांच्या मते, ज्या वकीलांनी या प्रकरणात सहकार्य केले असेल, त्यांना कदाचित याची योग्य माहिती नसावी. ते पुढे म्हणाले की, या परिस्थितीत घाबरण्यासारखे काहीही नाही आणि असे प्रकार घडत नाहीत.
आयुष्यात प्रत्येकाला मूर्खपणा सिद्ध करण्याची एक संधी मिळते, परंतु काही लोक त्यातही घाई करतात. हे प्रकरण त्याच प्रकारात मोडणारे आहे, असे सूचक विधान त्यांनी केले. या संदर्भात असा विचार येणेच हास्यास्पद आहे, असे रोडे यांनी म्हटले. त्यामुळे या विषयाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, याकडे दुर्लक्ष करणेच अधिक योग्य राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
