Sadabhau Khot | Shambhuraj Desai यांचा Resignation मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, सदाभाऊ खोत यांची मागणी

Sadabhau Khot | Shambhuraj Desai यांचा Resignation मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, सदाभाऊ खोत यांची मागणी

| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 8:52 PM

शंभुराज देसाई हे बोलघेवडे गृहराज्यमंत्री असून मुख्यमंत्र्यानी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कराड येथे केली आहे.

सातारा : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) सदाभाऊ खोत तुटून पडत आहेत. आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातही (St worker Strike) तेच दिसून आलं. आता गर्भवती वनगकर्मचारी महिलेवरील हल्ल्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांना टार्गेट केले आहे. शंभुराज देसाई हे बोलघेवडे गृहराज्यमंत्री असून मुख्यमंत्र्यानी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कराड येथे केली आहे. सातारा तालुक्यातील पळसवडे येथील गर्भवती वनकर्मचारी महिलेवर हल्ला प्रकरणावरून ते बोलत होते. साताऱ्यातील गुन्हेगारी वाढत असताना गृहराज्यमंत्री जिल्ह्यात करतात काय? असा सवाल केला आहे. तसेच शंभूराज देसाई आभाळात वार केल्यासारखे बोलतात असेही ते म्हणाले आहेत.

Published on: Jan 21, 2022 08:52 PM