संभाजी भिडेंचं आक्षेपार्ह वक्तव्य, ‘हिंदू महामूर्ख अन् दांडिया हिंदूना *#@* पणाकडे नेतोय’

| Updated on: Oct 04, 2024 | 11:24 AM

नेहमी वादाच्या केंद्रस्थानी राहणाऱ्या संभाजी भिडे यांनी हिंदूबद्दलच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदूंना महामूर्ख म्हणत संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली त्यानंतर विरोधकांनी सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.

आपल्या वक्तव्याने कायम वादाला फोडणी देणारे संभाजी भिडे यांनी हिंदू समाजावरच आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. योग्य अयोग्य शत्रू हिंदूंना कळत नाही. हिंदूंना संभाजी भिडे यांनी महामूर्ख म्हटलंय. तसंच हिंदूस्थानला संभाजी भिडे बेशरमांचा समाज देखील म्हणताय. ‘जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमणं केली. ते आता पाठलाग करतायत, हिंदी-चिनी भाई-भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदू-मुस्लिम भाई-भाई, हिंदुंना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण, चांगलं कोण हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात आहे’, असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय. सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडला सुरूवात झाली. यावेळी गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवात दांडिया हिंदू समाजाला गांडूपणाकडे घेऊन चालला आहे. हे सर्व नाही चालणार नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

Published on: Oct 04, 2024 11:24 AM