Sameer Wankhede | नवाब मलिकांचे माझ्यावरील आरोप खोटे, मलिकांनी दाखवलेले फोटो मुंबईतले : समीर वानखेडे

Sameer Wankhede | नवाब मलिकांचे माझ्यावरील आरोप खोटे, मलिकांनी दाखवलेले फोटो मुंबईतले : समीर वानखेडे

| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 9:21 PM

मलिकांनी आपल्या मृत आईवर, निवृत्त वडिलांवर आणि बहिणीवर चुकीचे आणि गंभीर आरोप केले. त्यांचं मी खंडन करतो. तसेच त्यांनी बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन जासूसी केली, असं देखील समीर वानखेडे आक्रमकपणे म्हणाले.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवर मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तर दिलं. आमच्या कार्यालयीन कामकाजांवरुन वैयक्तिक पातळीवर खालच्या पातळीत आणि घाणेरडे आरोप केले जात असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं. मलिकांनी आपल्या मृत आईवर, निवृत्त वडिलांवर आणि बहिणीवर चुकीचे आणि गंभीर आरोप केले. त्यांचं मी खंडन करतो. तसेच त्यांनी बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन जासूसी केली, असं देखील समीर वानखेडे आक्रमकपणे म्हणाले.

“त्यांनी केलेले आरोप प्रोफेशनलिझम असतील तर मला त्यावर काहीच आक्षेप नाही. एका मृत महिलेवर तुम्ही आरोप करत आहात. माझी बहीण जी लहान मुलांची आई आहे, तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन तुम्ही तिची जासूसी करत आहात. एक वृद्ध माजी सैनिकावर आरोप करत आहात. कशासाठी? तर जे देशासाठी काम करत आहेत त्याच्यावरुन. आम्ही जे प्रोफेशनल काम करत आहोत, कारवाईवरुन तुम्ही वैयक्तीक टार्गेट करत आहात. पण यातून माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. माझे मनौधैर्य खालवणार नाही”, असं समीर वानखेडे रोखठोकपणे म्हणाले.

Published on: Oct 21, 2021 09:20 PM