बाळाला घेऊन तो निघाला, टोकाचं पाऊल उचलणार पण…शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यामुळे जीव वाचला; काय घडलं?

बाळाला घेऊन तो निघाला, टोकाचं पाऊल उचलणार पण…शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यामुळे जीव वाचला; काय घडलं?

| Updated on: Jul 19, 2026 | 11:09 AM

सांगलीत सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. कृष्णा नदीच्या पुलावरून जात असताना शिवसेनेचे सांगली-मिरज संपर्क प्रमुख यांना एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे दिसले. चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्ती स्वतःच्या लहान बाळासह टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले.

सांगलीत सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. कृष्णा नदीच्या पुलावरून जात असताना शिवसेनेचे सांगली-मिरज संपर्क प्रमुख यांना एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे दिसले. चौकशी केल्यानंतर संबंधित व्यक्ती स्वतःच्या लहान बाळासह टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवत मदतीसाठी पुढाकार घेतला.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीशी शांतपणे संवाद साधत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांनी तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

अवघ्या 5 ते 10 मिनिटांत पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही संबंधित व्यक्तीशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि बाळासह दोघांनाही सुरक्षित ठिकाणी नेले.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने कौटुंबिक कारणांमुळे आणि पत्नीसोबतच्या वादामुळे मानसिक तणावात असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार केल्याचे समोर आले.

या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला आवश्यक समुपदेशनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वेळेत दाखवलेल्या सतर्कतेमुळे दोन जीव सुरक्षित राहिल्याने स्थानिक नागरिकांनी शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

Published on: Jul 18, 2026 3:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us