Sanjay Nirupam : संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका

Sanjay Nirupam : संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊतांवर खालच्या भाषेत टीका

| Updated on: Apr 13, 2025 | 4:18 PM

Sanjay Nirupam Abusive Remark : खासदार संजय राऊत यांच्याविषयी पत्रकार परिषदेत वक्तव्य करताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांची जीभ घसलरलेली बघायला मिळाली.

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांच्याकडून संजय राऊत यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आलेली आहे. संजय राऊतांच्या वक्तव्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही, असंही निरुपम म्हणाले आहेत. याचवेळी बोलताना निरुपम यांची जीभ घसरल्याचं बघायला मिळालं आहे.

संजय राऊत यांच्याकडून सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच महायुती सरकारवर टीका केली जाते.  त्यानंतर आज पत्रकार परिषदेत राऊत यांच्याविषयी बोलताना संजय निरुपम यांची जीभ घसरलेली बघायला मिळाली. यावेळी बोलताना निरुपम म्हणाले की, आता लोकांना देखील वाटू लागलं आहे की संजय राऊत म्हणजे एखाद्या चु**** सारखा काहीतरी बोलतो दररोज. त्यांचं बोलणं आता कोणीही गांभीर्याने घेत नाही, असं म्हणत निरुपम यांची जीभ घसरलेली बघायला मिळाली.

Published on: Apr 13, 2025 04:18 PM