शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्… अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. राम मंदिरासाठी देणगी म्हणून दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोंदी गायब झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दान केलेली चांदीची वीट देखील बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. राम मंदिरासाठी देणगी म्हणून दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोंदी गायब झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दान केलेली चांदीची वीट देखील बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरातून चौकशीची मागणी होत आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, राम मंदिरासाठी शिवसेनेकडून 4 किलो वजनाची चांदीची वीट दान करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हजारो शिवसैनिक आणि साधू-संतांच्या साक्षीने ही वीट मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली होती.
मात्र, इतकी वर्षे उलटल्यानंतरही त्या वीटेची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच ट्रस्टकडून कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
