Sanjay Raut | संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका

Sanjay Raut | संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका

| Updated on: Mar 14, 2026 | 2:00 PM

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा परिणाम भारतावरही जाणवत असून यामुळे गॅस आणि इंधनाचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका करत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. राऊत म्हणाले की, “हा विषय भ्रष्टाचाराचा नाही, पण नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सगळं काही अदानीकडे विकलं; फक्त काही नदी-नाले शिल्लक होते, त्यातली मिठी नदी विशेष महत्त्वाची आहे.”

राऊतांनी मोदींच्या गॅस योजनेंवरही कटाक्षाने टीका केली आणि सांगितले की, “मोदींनी सांगितले की गटारातून गॅस काढून त्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी, चहा बनवण्यासाठी करता येईल. ही योजना मिठी नदीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साकार होऊ शकते.” त्यांनी पुढे सांगितले की, “जिथे जिथे गटार आहेत, तिथे त्यांची किंमत वाढली आहे. आतापर्यंत मुंबईत रिअल इस्टेटची किंमत वाढत होती, पण मोदींच्या कृपेमुळे नदी, नाले, गटार आणि ड्रेनेज यांची किंमतही वाढली आहे.”

राऊतांनी आरोप केला की, “भारतीय जनता पक्ष आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करणार आहे.” त्यांच्या मते, युद्धाचा परिणाम, चुकीच्या धोरणे आणि देशातील गॅस व पर्यावरणीय संसाधनांचा गैरवापर यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे

Published on: Mar 14, 2026 02:00 PM
Follow Us