तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून… शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून… शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

| Updated on: Aug 15, 2026 | 11:09 AM

शिवसेना चिन्हाच्या पक्षविषयक वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या न्यायालयात जो निकाल लागला, तोच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल, असा विश्वास व्यक्त केला होता.

शिवसेना चिन्हाच्या पक्षविषयक वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या न्यायालयात जो निकाल लागला, तोच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत यांनी फडणवीसांच्या विधानावर प्रश्न उपस्थित करत न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये, असा इशारा दिला. ‘हाच निकाल लागेल’ असं सांगणं म्हणजे धमकी आहे का, असा सवाल त्यांनी केला. तसेच तुम्ही काय सुप्रीम कोर्टातील न्यायामूर्तींना भेटून आला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एका बाजूला मोदी फुटीर खासदारांना ‘मी तुमच्या पाठिशी आहे’ असं म्हणतात, तर दुसऱ्या बाजूला फडणवीस ‘आमच्या बाजूने निकाल लागेल’ असं म्हणतात, असा दावा राऊत यांनी केला.

‘या धमक्या देऊ नका. तुम्ही त्यात पडू नका. तुटेपर्यंत ताणू नका,’ असा इशाराही त्यांनी दिला. न्यायालयाला आपलं काम करू द्या, असं सांगत हे विधान कोर्टाच्या रेकॉर्डवर आणणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.

Published on: Aug 15, 2026 11:09 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us