Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका

Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका

| Updated on: Oct 03, 2026 | 10:53 AM

संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या संयुक्त मोर्चाची माहिती देत, राष्ट्रीय राजकारणात मोठे बदल होणार असल्याचे भाकीत केले. मोदी-शहांना जावे लागेल आणि जानेवारीपर्यंत भूकंपाचे धक्के बसतील, असे ते म्हणाले. दडपशाहीला घाबरणार नाही, लाठी हो या गोली, हमको नही रोक सकते, असे आव्हान राऊतांनी दिले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. लवकरच होणाऱ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाची माहिती देताना, हा मोर्चा ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. या मोर्चाला शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आणि डाव्या पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

राऊतांनी राष्ट्रीय राजकारणाबद्दल मोठे भाकीत केले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भाजप आणि संघ परिवारात अवस्था वाईट झाली असून, जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत देशात मोठे राजकीय बदल होतील आणि मोदींना पंतप्रधानपदावरून जावे लागेल, असा दावा त्यांनी केला. तसेच, दडपशाहीने आंदोलने थांबणार नाहीत असे स्पष्ट करत, लाठी हो या गोली, हमको नही रोक सकते अशा शब्दांत त्यांनी सरकारला आव्हान दिले. देवेंद्र फडणवीस यांना उपपंतप्रधान बनवण्याची संघाची भूमिका असल्याचा दावाही त्यांनी केला.

Published on: Oct 03, 2026 10:53 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us