Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल

Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल

| Updated on: Oct 10, 2026 | 10:57 AM

संजय राऊत यांनी दिल्लीतील आंदोलकांवरील सरकारच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे. दिल्लीकडे जाणारे रस्ते बंद करून, विमाने वळवून आणि रेल्वे थांबवून तरुणांना अटक केल्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारला. 56 इंच छातीवाले पंतप्रधान आणि गृहमंत्री देशातील तरुणांना का घाबरले आहेत, असा सवाल राऊत यांनी केला. त्यांनी सरकारच्या पतनाची भविष्यवाणी करत याला जनतेचं बंड म्हटले.

संजय राऊत यांनी दिल्लीतील आंदोलकांविरुद्ध केंद्र सरकारने केलेल्या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीकडे जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत, विमाने वळवण्यात आली आहेत आणि रेल्वे थांबवून आंदोलक तरुणांना अटक करण्यात आली आहे. राऊत यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर निशाणा साधत विचारले की, “जे स्वतःला 56 इंचाची छाती असलेले म्हणवतात, ते या देशातील तरुणांना का घाबरले आहेत?”

राऊत यांच्या मते, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांची ही नाकेबंदी ब्रिटिश काळातही झाली नव्हती. हजारो वाहने अडकून पडली आहेत, पण दिल्लीचे मुख्यमंत्री (रेखा गुप्तांना) काय चालले आहे, याची माहिती नाही, असेही त्यांनी नमूद केले. जनतेच्या या बंडाला अशाप्रकारे दाबून सरकार थांबवू शकणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

राऊत यांनी पुढे म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे पतन सुरू झाले आहे आणि मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत हे सरकार शेवटचा श्वास घेईल. त्यानंतर एक राष्ट्रीय सरकार स्थापन होईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली. गेल्यावेळी जंतरमंतरवर झालेल्या सीजेपी आंदोलनाचा धसका सरकारने घेतला आहे, असेही राऊत यांनी सुचवले.

Published on: Oct 10, 2026 10:57 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us