Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
संजय राऊत यांनी ठाण्यात पूर्णेकर समर्थकांना झालेल्या मारहाणीवरून पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलिसांचे वर्तन अमानुष असून, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. विजय मल्ल्या प्रकरणाचा उल्लेख करत राऊत यांनी उद्योग उद्ध्वस्त करण्याच्या कारस्थानांवर प्रकाश टाकला. तसेच, संजय गायकवाड यांच्या शेतकरी विरोधी विधानावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी ठाणे पोलिसांवर पुरणेकर समर्थकांना अमानुषपणे मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पुरणेकर हत्या प्रकरणात आंदोलकांना पोलिसांनी कोठडीत मारहाण केली, पार्श्वभागात ॲसिड व मिरची पावडर टाकली, असे राऊत यांनी म्हटले आहे. या घटनेबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाणे पोलीस पालकमंत्र्यांच्या घरी धुणी-भांडी करतात का, असा सवाल करत, ठाण्यात पोलिसांचे नाही तर अंडरवर्ल्डचे राज्य सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. गायकवाड यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई न केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणवणारे लोक असे बोलतात याचा महाराष्ट्राने धिक्कार करावा, असे राऊत म्हणाले. विजय मल्ल्या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी उद्योगपतींना देश सोडून जाण्यास कसे भाग पाडले जाते, यावरही भाष्य केले.
