मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले…

मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले…

| Updated on: Jul 01, 2026 | 10:49 AM

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. काल विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. सचिन अहिर हे 'उबाठा'मधील वरळी येथील नेते आहेत.

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. काल विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. सचिन अहिर हे ‘उबाठा’मधील वरळी येथील नेते आहेत. महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्या उपसभापती पदासाठीचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

या राजकीय घडामोडीनंतर अनेक सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी उबाठा गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या सबंध प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी सांगितले, ‘हे सर्व जे पक्षांतर करत आहेत, ते मोठ्या पदासाठीच गेले आहेत. आम्ही त्यांना सगळं दिलं तरी ते गेले… एकनाथ शिंदे यांना तर चक्क मुख्यमंत्री पद मिळालं होतं बंडखोरी करून, तसंच सचिन अहिर यांनाही पद मिळतंय.’ ‘त्यांचा इतिहास अतिशय कलंकित आहे,’ असा आरोपदेखील यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

Published on: Jul 01, 2026 10:49 AM
Follow Us