Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा…शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: Jun 22, 2026 | 4:16 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. संबंधित सहा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी दाखल झाले असून, त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. संबंधित सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी दाखल झाले असून, त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, ठाकरे गटाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विषयावर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली.

माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत, राऊत म्हणाले शिंदे-मींदे बाळंत झाले आहेत, आणि त्यांनी 6 गद्दारांना जन्म दिला आहे. आणि ऑपरेशन सुखरूप असं राऊत म्हणाले, बॉडी त्यांची सुस्थितीत नाही आहे त्यांना पुढे सिजरींग करावा लागेल व्यवस्थित, केनियामध्ये एका बाईला 5 मुलं झाली होती आणि आता इथे 6 गद्दारांचा नंदनवनला पाळणा हलला आहे अशी जहरी टीका राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. राऊत यांनी पुढे म्हणाले की, नंदनवन येथे सुरू असलेल्या या राजकीय घडामोडी म्हणजे शिवसेनेतील फुटीचे आणखी एक उदाहरण असून, पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारी ही घटना आहे.

दरम्यान, सहा खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची लोकसभेतील ताकद वाढणार असून, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर याचे मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे.

Published on: Jun 22, 2026 4:16 PM
Follow Us