भाजपची लोकप्रियता घरसत आहे, सहाच महिन्यात 40 हजारांहून अधिक मतदार…. राऊतांनी बिहार पोटनीवडणुकीबाबत नेमकं काय सांगितलं?
खासदार संजय राऊत यांनी बांकीपूरमध्ये झालेल्या भाजपच्या पराभवावर भाष्य करत या निकालाचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात, यावर भाष्य केले. पोटनिवडणुकीतील निकालामुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढतो, असे राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत म्हणाले, “देशात सध्या जे वातावरण आहे, मोदी, भाजपची लोकप्रियता किती घसरलीय त्याचं बांकीपूर उदाहरण आहे. जी जागा तुम्ही 1995 पासून जिंकताय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची रिक्त जागा जी त्यांनी आधी 40 हजारच्या फरकाने जिंकलेली. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकला नाहीत.”
तसेच, सहा ते सात महिन्यांनंतरच भाजपला 40 हजारांहून अधिक लोक नकार देतात, असेही त्यांनी सांगितले. पोटनिवडणुकीच्या निकालामुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भूमिकेला जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचे राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी पोटनिवडणुकांच्या इतिहासाचा दाखला दिला. अलाहाबाद पोटनिवडणुकीत व्ही.पी. सिंह यांच्या विजयापासून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे बांकीपूरचा निकाल भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.