Sanjay Raut Tweet | जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ

Sanjay Raut Tweet | जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ

| Updated on: Feb 14, 2026 | 5:01 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत जमीन मोजणीदरम्यान संबंधित जमीनमालकाने विरोध केल्यानंतर नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथून पळ काढल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत जमीन मोजणीदरम्यान संबंधित जमीनमालकाने विरोध केल्यानंतर नार्वेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथून पळ काढल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. यावेळी स्थानिक नागरिक आणि नार्वेकर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचेही सांगितले जात आहे. राऊत यांनी पुढे आरोप केला की, अलिबागमधील संबंधित जागा गुजरातमधील एका गुंतवणूकदाराला फार्महाऊससाठी हवी आहे आणि त्यासाठी ही जमीन पाहणी केली जात आहे. काही प्रभावशाली लोकांच्या नजरेत जमीन भरली की ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Published on: Feb 14, 2026 05:01 PM