निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर… संजय शिरसाटांचा मोठा दावा

निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर… संजय शिरसाटांचा मोठा दावा

| Updated on: May 11, 2026 | 2:17 PM

सध्या राज्यभरात नाशिकमधील टीसीएस कंपनीच्या चर्चांनी जोर धरला आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. नाशिकमधील या कंपनीत निदा खान तसेच अनेक सहकारी महिलांचे लैंगिक शोषण, तसेच धर्मांतरण करत असल्याचं समोर आलं आहे.

सध्या राज्यभरात नाशिकमधील टीसीएस कंपनीच्या चर्चांनी जोर धरला आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. नाशिकमधील या कंपनीत निदा खान तसेच अनेक सहकारी महिलांचे लैंगिक शोषण, तसेच धर्मांतरण करत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील महिला सूत्रधार निदा खान हिला अटक झाली असून तिला मतीन पटेल या एमआयएम नेत्याने आश्रय दिल्याचं समोर आलं होतं. यावर शिंदेंच्या शिवसेनेतील संजय शिरसाट यांनी महत्त्वाची माहिती दिली.

संजय शिरसाट म्हणाले, “अशा अनेक निदा खान महाराष्ट्रभर फिरत आहेत. यांना एमआयएम पक्षच पाठीशी घालत असून सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. उद्या महाराष्ट्राची ‘केरला फाईल्स’ होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेणं देखील गरजेचं आहे.”

पुढे शिरसाट म्हणाले, “निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातेवाईक आहे. ती जलील यांच्या वहिनीची जवळची नातलग असल्यामुळे त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे.”

Published on: May 11, 2026 02:17 PM
Follow Us