ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील…
ठाकरे गटात सुरू असलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानंतर आता 130 जेष्ठ शिवसैनिक पुन्हा मैदानात उतरले आहेत.

पक्षातील नाराजी आणि गळती रोखण्यासाठी या ज्येष्ठ शिवसैनिकांनी पुढाकार घेतला असून, येत्या रविवारी पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चलो मातोश्री दर्शन’ या उपक्रमातून हे सर्व शिवसैनिक मुंबईतील मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षातील निष्ठा दाखवणार आहेत तर अनेक त्रुटींवर काम करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख वसंत मोरे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. पक्ष अडचणीत असताना जेष्ठ शिवसैनिकांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटात नवचैतन्य निर्माण झाल्याची चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.