चार दिवसांच्या उपचारानंतर शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाला आहे. चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांनी त्यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
गेल्या पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी त्यांना खोकल्याचा त्रास जाणवत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता उपचारानंतर ते पुण्यातील त्यांच्या मोदी बागेतील निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. त्यांची प्रकृती सध्या व्यवस्थित असून, डॉक्टरांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी आलेल्यांकडून संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती.
Published on: Feb 25, 2026 11:10 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
