राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला

राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला

| Updated on: Jul 21, 2026 | 4:44 PM

सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या संसद मार्चनंतर हे आंदोलन संपून जाईल, असे म्हटले जात होते. परंतु आता जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली.

Sharad Pawar Meets Abhijeet Dipke | सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या संसद मार्चनंतर हे आंदोलन संपून जाईल, असे म्हटले जात होते. परंतु आता जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा सीजेपीचे आंदोलन जंतर-मंतरवर सुरूच आहे. दरम्यान, या आंदोलनात आता विरोधी पक्षदेखील सहभागी होत आहेत. एकीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी सीजेपीचं समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे खासदार शरद पवार हे दीपके यांच्या भेटीला पोहोचले आहेत. अभिजित दीपके आणि पवार यांच्यात संवाद झाला आहे.

पवार यांनी दीपके यांची भेट घेतली. त्यानंतर दीपके यांनी सध्या आंदोलनाची काय स्थिती आहे, याची माहिती पवार यांना दिली. सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांना एका प्रकारे नजरकैदेत ठेवलं आहे. आमच्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे मागे घ्यावेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीमाना झाला पाहिजे. आत्महत्या करण्यात आलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपये द्यावे. सर्व आंदोलकांवरील देशातील एफआयआर मागे घ्या. तसेच वांगचुक यांना सोडा, अशा आमच्या मागण्या असल्याची माहिती दीपके यांनी पवार यांना दिली.

Published on: Jul 21, 2026 4:44 PM
Follow Us