मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?

मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?

| Updated on: Jul 22, 2026 | 11:57 AM

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली आहे. या भेटीला खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीच्या आदल्या दिवशी शरद पवार यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला भेट देत आंदोलनाचे प्रमुख अभिजित दीपके यांच्याशी संवाद साधला होता. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आणि विद्यार्थ्यांची भूमिका त्यांनी जाणून घेतली होती.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीत NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन किंवा अलीकडील घडामोडींवर चर्चा झाली का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या भेटीबाबत दोन्ही बाजूंनी अधिकृत निवेदनही जारी करण्यात आलेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि दिल्लीतील घडामोडींमुळे देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात असून, या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर किंवा आंदोलनासंदर्भात चर्चा झाली का, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 22, 2026 11:57 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us