Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितलं कारण

Sharad Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांचा विरोध; स्पष्टच सांगितलं कारण

| Updated on: Jun 17, 2025 | 5:16 PM

Sharad Pawar News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच याबद्दल शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

संधीसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही, असं म्हणत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्यास शरद पवार यांनी विरोध दर्शवला आहे. भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही, असंही पवार म्हणालेत. तर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं म्हणत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे बंधूंनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच या चर्चांना आता शरद पवार यांनीच ब्रेक लावला आहे. गांधी, नेहरू, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे असलेल्यांना सोबत घेऊ. संधिसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, असं शरद पवार म्हणालेत. तर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर दिली आहे.

Published on: Jun 17, 2025 05:16 PM