शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
उपचारानंतर विश्रांती घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. उद्या ते पुण्यातील ओतूर येथे राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात शरद पवारांसह दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात याकडे विशेष लक्ष लागले आहे.
मुंबईतील उपचारानंतर घरी विश्रांती घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. उद्या ते पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे आयोजित राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची खासियत अशी आहे की, यावेळी शरद पवारांसोबत अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहणार आहेत.
यामुळे शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे तिघे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा होती, मात्र आता ती थांबलेली दिसते. शरद पवारांच्या या पहिल्याच सार्वजनिक कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. खासदार शाहू महाराज या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील.
Published on: Nov 20, 2026 8:40 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
