Shirdi Miracle Claim : शिर्डीत चमत्कार? साईबाबांचं दर्शन अन् अंध मुलाला दृष्टी! उत्तराखडंच्या कुटुंबाचा दावा बघा काय?
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनानंतर एका अंध मुलाला दृष्टी मिळाल्याचा दावा उत्तराखंडमधील एका कुटुंबाने केला आहे. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या दाव्याला आव्हान देत, साई संस्थानने हे सिद्ध केल्यास 21 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. समितीने साई संस्थानला रुग्णालय बंद करून अंध भक्तांना मंदिरात पाठवण्याचे आवाहन केले आहे.
शिर्डीमध्ये एक चमत्कारच झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यापूर्वी शिर्डीतील द्वारकामाईमध्ये स्वतःच्या हाताने साईबाबांनी पाण्याने दिवे प्रज्वलित केल्याच्या कथा आपण ऐकून आहोत. त्यानंतर आजची ही बातमी जाणून घेतल्यानंतर तुम्हीली अवाक् व्हाल. कारण शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनानंतर एका अंध मुलाला दृष्टी मिळाल्याचा दावा उत्तराखंडमधील एका कुटुंबाने केला आहे. या कथित चमत्काराशी संबंधित व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (MANS) या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. अंनिसने म्हटले आहे की, अशा चमत्कारांना थारा देऊ नये आणि साई संस्थानने हे सिद्ध केल्यास आम्ही 21 लाख रुपयांचे पारितोषिक देऊ. समितीने साई संस्थानला आव्हान दिले आहे की, जर साईबाबांच्या चमत्काराने दृष्टी येत असेल तर त्यांनी त्यांचे रुग्णालय बंद करून अंध भक्तांना थेट मंदिरात पाठवावे. साई संस्थानने अद्याप यावर कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.
