Balasaheb Thackeray Smritidin : बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिकांची मोठी गर्दी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तेरावा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतीस्थळावर मुंबई महानगरपालिका आणि शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून शिवसैनिक अभिवादनासाठी येत आहे. मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृतीदिन असून, या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी होत आहे. मुंबई महानगरपालिका आणि शिवसेना पक्षाकडून या कार्यक्रमासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. मागच्या आठवड्यातच पालिकेच्या उद्यान विभागाने स्मृतीस्थळावर नवीन फुले आणि झाडे लावली आहेत. तसेच, स्मृतीस्थळावर फुलांची आकर्षक आरास केली असून, बाळासाहेबांचा फोटोही लावण्यात आला आहे.
सकाळी आठ वाजल्यापासूनच अनेक शिवसैनिक बाळासाहेबांना आदराने अभिवादन करण्यासाठी येत आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर उपस्थित राहणार आहे. इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही या प्रसंगी उपस्थित राहतील.
