Shivsena : शिवसेनेच्या महिला नेत्या काँग्रेस कार्यालयावर धडकल्या अन्… माजी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक होण्याचं कारण काय?
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नव्हे तर सनातन दहशतवाद म्हणा असे म्हटले होते. याच विधानावरून आज शिंदेच्या शिवसेनेचे उग्र आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.
हिंदू टेरर, सनातन टेरर आणि हिंदू दहशतवाद अशा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात तीव्र वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत. हिंदुत्वावरून केलेल्या काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
आज मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन सुरू असून शायना एन सी, मनिषा कायंदे आणि शीतल म्हात्रे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी आंदोलन पुकारले. शिवसैनिकांनी यावेळी काँग्रेसच्या मुख्यालयावर धडक देत मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हिंदुत्वावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर आक्रमक होत महिला शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. महिला शिवसैनिकांनी आपला मोर्चा टिळक भवनाबाहेर नेला. मात्र यावेळी पोलिसांनी या मोर्चाला आणि महिला शिवसैनिकांना रोखल्याचे पाहायला मिळाले.
