Sanjay Raut | फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात…

Sanjay Raut | फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात…

| Updated on: Jun 22, 2026 | 3:01 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा बंडखोर खासदार मुंबईत दाखल झाले असून, त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज निर्णायक वळण मिळणार असून, हे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या शिवसेना (शिंदे) पक्षामध्ये अधिकृत प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दिल्लीहून मुंबईत आगमन झाल्यानंतर हे सर्व खासदार थेट एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाले. दुपारी पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या भूमिकेबाबत अधिकृत भूमिका मांडणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये बंडखोर खासदारांवर निशाणा साधत कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले.

राऊत यांनी म्हटले की, फुटीर खासदार मुंबईत परतल्यानंतर “चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे.” तसेच त्यांनी या खासदारांवर गंभीर आरोप करत, ते मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून पक्ष सोडून गेल्याचा दावा केला.

पुढे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “मुंबई विमानतळावर उतरलेले खासदार शस्त्रधारी पोलिसांच्या गराड्यात बाहेर पडले. अशी राजकीय वाटचाल अभिमानाची नसून लाजिरवाणी आहे.” यासोबतच त्यांनी बंडखोर खासदारांच्या निर्णयावर टीका करत भविष्यात त्यांच्या पुढील पिढ्यांनाही या निर्णयाचा उल्लेख करावा लागेल, अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, ठाकरे गटातून झालेल्या या मोठ्या फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, आगामी काळात या घडामोडींचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 22, 2026 3:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us