Sanjay Raut Uncut | हे कुठले झाले आमच्या पक्षाचे मालक? शिंदेंसोबतचा प्रत्येक माणूस अपात्र ठरेल; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी राऊतांची स्फोटक प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि न्यायमूर्ती बी. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असून, अंतिम युक्तिवादाच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाचे निर्देश दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या चार वर्षांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, आजच्या सुनावणीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. कायद्यानुसार आणि संविधानातील दहाव्या अनुसूचीतील (Anti-Defection Law) तरतुदींचे काटेकोर पालन करून न्यायालयाने निर्णय दिल्यास, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रत्येक आमदाराची सदस्यता रद्द होईल, असा दावा त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, “दहाव्या अनुसूचीतील नियमांनुसार निर्णय झाला, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला प्रत्येक सदस्य बाद होईल. मग ते आमच्या शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे मालक कसे होऊ शकतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याचवेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले. “शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील निर्णयप्रक्रियेत सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने मिळून देशातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, आजच्या सुनावणीत अंतिम युक्तिवादाच्या वेळापत्रकाबाबत न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश येण्याची शक्यता असून, या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या पुढील सुनावणीच्या दिशेने महत्त्वाची पायरी ठरणार असल्याचे मानले जात आहे.