Saamana |  ‘सामना’तून नितेश राणेंवर जोरदार टीका; सरकारी निधी वाटपावर गंभीर आरोप

Saamana | ‘सामना’तून नितेश राणेंवर जोरदार टीका; सरकारी निधी वाटपावर गंभीर आरोप

| Updated on: Feb 09, 2026 | 10:14 AM

शिवसेनेच्या मुखपत्र 'सामना'मधील अग्रलेखातून भाजप नेते नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. पक्ष आणि निवडणूक चिन्ह पाहून निधी दिला जात असल्याच्या वक्तव्यावरून सामना अग्रलेखात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ‘मी पक्ष आणि चिन्ह पाहून निधी देतो, मशाल चिन्ह असेल तर एक रुपयांचाही निधी देणार नाही,’ असे उघडपणे बोलणारे भंपक आणि टाकाऊ लोक देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत, अशी कठोर टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’मधील अग्रलेखातून भाजप नेते नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. पक्ष आणि निवडणूक चिन्ह पाहून निधी दिला जात असल्याच्या वक्तव्यावरून सामना अग्रलेखात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ‘मी पक्ष आणि चिन्ह पाहून निधी देतो, मशाल चिन्ह असेल तर एक रुपयांचाही निधी देणार नाही,’ असे उघडपणे बोलणारे भंपक आणि टाकाऊ लोक देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत, अशी कठोर टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. नितेश राणे हे कणकवलीतील एखाद्या पेट्रोल पंपावरून निधी आणत नसून, जनतेच्या करातून जमा झालेल्या सरकारी निधीचे अलोकशाही पद्धतीने वाटप करणे म्हणजे सरकारी पैशांचा अपहार असल्याचा गंभीर आरोपही अग्रलेखात करण्यात आला आहे. निवडून आलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचा सरकारी निधीवर समान अधिकार असतो, असे स्पष्ट मत सामनामधून मांडण्यात आले आहे.

याचबरोबर नाशिक आणि कल्याण-डोंबिवली येथे शिवसेना आणि मनसे एकत्र लढूनही निवडून आलेल्यांना पराभव पत्करावा लागल्याचा उल्लेखही अग्रलेखात करण्यात आला आहे. हे किळसवाणे राजकारण असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीरपणे केली होती. मात्र, फक्त मनस्ताप व्यक्त करून राजकारण थांबणार का? असा सवालही सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

Published on: Feb 09, 2026 10:14 AM