धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण… अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एका शेतकऱ्याला जमावाकडून काठ्या आणि लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करण्यात आली आहे. टाकळी लोणार ते पिसोरे खांड रस्त्यावर घडलेल्या या घटनेत शेतकऱ्याच्या खिशातील 21 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस तपास करत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एका शेतकऱ्याला जमावाकडून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टाकळी लोणार ते पिसोरे खांड या रस्त्यावर ही घटना घडली असून, शेतकऱ्याला काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. मारहाणीनंतर शेतकऱ्याच्या खिशातील 21 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या घटनेत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पीडित शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “मला येतानी प्रतीक पाचपोते आणि त्याच्या साथीदारांनी अडवले. त्यांना हात जोडून सांगितले की आम्ही तसली माणसं नाहीत, तुम्ही आमच्या गोठ्यात येऊन सगळं बघा. मात्र, त्यांनी काहीही कारण नसताना शिवीगाळ करत काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.” पीडित शेतकऱ्याने आपल्यावर अमानुष अत्याचार झाल्याचे आणि “लघवी पाजून छळल्याचे” गंभीर आरोप केले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
