Anna Hazare : ‘नाक दाबलं की तोंड उघडतं..’, ‘पहलगाम’सह सिंधू जल करार स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?

Anna Hazare : ‘नाक दाबलं की तोंड उघडतं..’, ‘पहलगाम’सह सिंधू जल करार स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?

| Updated on: Apr 29, 2025 | 12:34 PM

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. यानंतर य़ंत्रणा अलर्ट मोडवर असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. अशातच हल्ल्याबाबत भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध लागल्याची माहिती मिळतेय.

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे गेल्या आठवड्यापूर्वी चार अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या अतिरेक्यांनी पर्यंटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच भारताकडून पाकिस्तानविरोधी पाच मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सिंधू जल करार स्थगिती कऱण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या घडामोडींदरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पहिल्यांदा या घटनेवर भाष्य केले आहे.

‘पर्यटकांवर हल्ला करणं हा सगळ्यात मोठा दोष आहेत. ते पर्यटक आहेत. ते हिंदुस्तान किंवा पाकिस्तानकडून आले नाहीत. त्यांचा संबंध नाही. त्यामुळे त्यांच्याशी संबंध लावणं हे चूक आहे’, अशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. इतकंच नाहीतर भारताकडून मोठी कारवाई करत सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानसाठी थांबवणं ही कृती योग्य असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. नाक दाबलं की तोंड उघडतं.. अशी म्हण आहे. त्याप्रमाणे सिंधू नदीचे पाणी थांबवणे ही कृती करणं गरजेची असल्याचे अण्णा हजारे म्हणाले.

Published on: Apr 29, 2025 12:34 PM