Special Report | अवघ्या 15 दिवसातच कोरोना रुग्णांचे आकडे नेमके कसे फिरले?

Special Report | अवघ्या 15 दिवसातच कोरोना रुग्णांचे आकडे नेमके कसे फिरले?

| Edited By: sagar joshi | Updated on: Jan 07, 2022 | 11:22 PM

फेब्रुवारीत सरासरी 15 हजार रुग्ण निघत होत, तो आकडा 1 लाखांपर्यंत जाण्यास एप्रिल महिना उजाडावा लागला होता. म्हणजे दुसऱ्या लाटेत 15 हजार ते 1 लाखांपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी दीड महिने लागले होते. मात्र सध्या तेच अंतर फक्त 7 दिवसात पार झालंय. 30 डिसेंबरला भारतात 16 हजार रुग्ण निघाले होते आणि फक्त 7 दिवसातच तोच दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा 1 लाख 17 हजारांवर गेलाय.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, ही दुसऱ्या लाटेहून कमी धोकादायक आहे असं सांगितलं जातं. मात्र सध्याच्या लाटेचा वेग हा दुसऱ्या लाटेहून कैक पटीनं मोठा आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात फेब्रुवारी 2021 मध्ये झाली. फेब्रुवारीत सरासरी 15 हजार रुग्ण निघत होत, तो आकडा 1 लाखांपर्यंत जाण्यास एप्रिल महिना उजाडावा लागला होता. म्हणजे दुसऱ्या लाटेत 15 हजार ते 1 लाखांपर्यंतचा टप्पा गाठण्यासाठी दीड महिने लागले होते. मात्र सध्या तेच अंतर फक्त 7 दिवसात पार झालंय. 30 डिसेंबरला भारतात 16 हजार रुग्ण निघाले होते आणि फक्त 7 दिवसातच तोच दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा 1 लाख 17 हजारांवर गेलाय.

आतापर्यंतच्या 3 कोरोना लाटांमध्ये कमी दिवसात जास्तीत-जास्त रुग्णसंख्यावाढीचं प्रमाण कसं वाढत गेलं, ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. पहिल्या लाटेत दिवसाला 1 लाख रुग्ण निघण्यासाठी 119 दिवस लागले होते. दुसऱ्या लाटेत तोच आकडा 1 लाखापर्यंत जाण्यासाठी 45 दिवस लागले. तर सध्याच्या लाटेत दिवसाला 1 लाख रुग्ण होण्यासाठी फक्त 11 दिवस लागले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर तर हॉटस्पॉट आहेतच, मात्र ज्या जिल्ह्यांनी फक्त 15 दिवसांपूर्वी कोरोनाला हद्दपार केलं होतं किंवा जिथं कोरोना संपण्याच्या उंबरठ्यावर आला होता, तिथंही पुन्हा रुग्णवाढ होऊ लागली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us