Mantralay Breaking | मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच, विरोधकांचा हल्लाबोल

Mantralay Breaking | मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच, विरोधकांचा हल्लाबोल

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 7:19 PM

यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालय बाहेर बसण्यासाठी असलेल्या व्हरांड्यात रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. प्रश्न उपस्थित होतो की मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असताना या बाटल्या येतात कशा ?

मुंबई : मंत्रालयात पुन्हा दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्रिमूर्ती पुतळ्याच्या मागे या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने, या भागात काम करणारे कर्मचाऱ्यांनी या बाटल्या आणल्या का हा प्रश्न उपस्थित होतोय. यापूर्वी देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालय बाहेर बसण्यासाठी असलेल्या व्हरांड्यात रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. प्रश्न उपस्थित होतो की मंत्रालयात कडेकोट सुरक्षा तपासणी होत असताना या बाटल्या येतात कशा ?