VIDEO : Chandrakant Patil | देशमुखांवर CBI काय अ‍ॅक्शन घेणार हे सांगण्याइतका मी CBI, EDचा अधिकारी नाही-पाटील

| Updated on: Nov 01, 2021 | 2:23 PM

100 कोटी वसुलीच्या आरोपामुळे पायउतार व्हावे लागलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी कार्यालयात दाखल झाले. सोमवारी सकाळीच ते ईडी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळतेय.

Follow us on

100 कोटी वसुलीच्या आरोपामुळे पायउतार व्हावे लागलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी कार्यालयात दाखल झाले. सोमवारी सकाळीच ते ईडी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुखांवर जोरदार निशाणा साधलाय. अनिल देशमुख आता प्रकट झाले आहेत. ते आधी का आले नाहीत? आता ईडी ठरवेल काय कारवाई करायची. आता जर ते ईडीसमोर आले नसते तर त्यांना फरार घोषित करण्यात आलं असतं. ते टाळण्यासाठीच ते आज ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले. मात्र, त्यांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असा टोला पाटील यांनी देशमुखांना लगावलाय.