22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने

22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने

| Updated on: Aug 29, 2026 | 2:03 PM

एस्सेल समूहाच्या २२ हजार कोटींच्या कर्जाचे ६.२५ कोटींमध्ये सेटलमेंट झाल्याच्या वृत्तावरून वाद सुरू झाला आहे. संस्थापक सुभाष चंद्रा यांनी रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की वैयक्तिक हमी ३,९९२ कोटींची होती, २२ हजार कोटींची नाही. रिलायन्सने हे आरोप निराधार ठरवत फेटाळून लावले आहेत.

एस्सेल समूहाच्या २२ हजार कोटी रुपयांच्या कथित कर्ज सेटलमेंट प्रकरणावरून सध्या भारतीय उद्योग जगतात नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे न्यायाधिकरणाने (NCLT) २२ हजार कोटींचे कर्ज ६.२५ कोटींमध्ये सेटल केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या प्रकरणात एस्सेल समूहाचे संस्थापक सुभाष चंद्रा गॅरेंटर असल्याने देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. यावर सुभाष चंद्रा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रिलायन्स मीडिया नेटवर्कवर “अफवा पसरवल्याचा” आणि “बदनामी” करण्याचा आरोप केला आहे.

चंद्रा यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कोणत्याही कर्जदात्याकडून पैसे घेतले नाहीत, तर व्यावसायिक समूहाच्या संपत्तीला खासगी संपत्ती म्हणून दाखवण्यात आले आहे. त्यांच्या मते, ज्या कंपन्यांसाठी त्यांनी वैयक्तिक हमी दिली होती, त्यांनी आतापर्यंत ४३ हजार कोटी रुपये परतफेड केली आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की त्यांच्याविरोधात केवळ ३,९९२ कोटींचा दावा होता, २२ हजार कोटींचा नाही. दुसरीकडे, रिलायन्स ग्रुपने सुभाष चंद्रा यांचे सर्व आरोप “निराधार” असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. रिलायन्सने म्हटले आहे की त्यांच्या मीडिया संस्थांचा वापर कधीही कुणावर हल्ला करण्यासाठी केला जात नाही आणि भविष्यकाळातही केला जाणार नाही.

Published on: Aug 29, 2026 2:03 PM
Follow Us